पटवर्धन क्लास

माहितीपत्रक २०२५ - २६

पटवर्धन क्लासची इयत्ता १० वी ची (Maharashtra SSC Board) बॅच मंगळवार, दिनांक ६ मे २०२५ पासून सुरु होत आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 98230 69165 या मोबाइल नंबर वर join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल.

(जुन्या विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवण्याची आवश्यकता नाही.)

क्लासची वैशिष्ट्ये
  • अनुभवी शिक्षक
  • तळमळीचे अध्यापन
  • वैयक्तिक लक्ष
  • सरावासाठी शेकडो प्रश्न
  • उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
माध्यम
  • English Medium
  • Semi English Medium
विषय
  • English (HL) Or English (LL)
  • Maths - I
  • Maths - II
  • Science - I
  • Science - II
Batch Timings
  • Monday to Saturday:

    7:00 PM to 8:30 PM

  • Sunday:

    9:00 AM to 10:30 AM

  • शाळा सुरु होईपर्यंत क्लास सकाळी 7:00 ते 10:30 या वेळात होईल.

  • आवश्यकतेनुसार काही वेळा ऑनलाईन क्लास घेतला जाईल. त्यासंबंधी अधिक माहिती वेळोवेळी देण्यात येईल.

क्लासची फी

क्लासची वर्षाची एकूण फी ₹ २५, ०२०/- आहे (रु. २५, ०००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:

  • प्रवेश घेताना: ₹ ५, ०२०/-
  • १० जून पर्यंत: ₹ ५, ०००/-
  • १० जुलै पर्यंत: ₹ ५, ०००/-
  • १० ऑगस्ट पर्यंत: ₹ ५, ०००/-
  • १० सप्टेंबर पर्यंत: ₹ ५, ०००/-

प्रवेश घेताना संपूर्ण फी भरल्यास रु. २,०००/- सवलत मिळेल.

मागच्या वर्षी क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना रु. १,००० सवलत मिळेल.

नियम व अटी
  • क्लास ३१ जानेवारी २०२६ पर्यंत क्लास चालू राहील.
  • सहामाही परीक्षा / दिवाळीच्या सुमारास क्लासला अंदाजे ३ आठवडे सुट्टी असेल.
  • क्लासमध्ये नियमित उपस्थित रहावे व पूर्ण लक्ष द्यावे.
  • गैरहजर असल्यास पालकांची चिठ्ठी आणावी.
  • पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्याची उपस्थिती पाहून जावी.
  • क्लासमध्ये दिलेला गृहपाठ करून आणणे आवश्यक आहे.
  • पालकांनी क्लास चालू असताना परस्पर शिक्षकांना भेटू नये.
  • स्वयंचलित दुचाकी वाहने क्लासमध्ये आणण्यास मनाई आहे.
  • विद्यार्थ्यांनी सायकली स्वतःच्या जबाबदारीवर लावाव्यात.
  • नेमून दिलेल्या तारखेपूर्वी फी भरावी. वेळेवर फी न भरल्यास क्लासमध्ये प्रवेश मिळणार नाही.
  • पूर्ण विचार करूनच फी भरावी. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • बेशिस्त वर्तन दिसल्यास क्लासमधून नाव कमी केले जाईल.

Standard 10 : Main Page